|| वैदिक शास्त्र ||
|| हवन कार्य ||
ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम्
हवन (होम) कार्य म्हणजे काय?
हवन हा वैदिक संस्कारांमधील महत्त्वाचा विधी आहे, ज्यामध्ये अग्निदेवतेसमोर आहुती अर्पण केली जाते. यामध्ये विशिष्ट मंत्र, आहुती व पवित्र अग्नीचा वापर केला जातो. हवन केल्याने वातावरण शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, आणि मानसिक व आध्यात्मिक शांती प्राप्त होते.
हवन कार्याची वैदिक पार्श्वभूमी
- ‘यज्ञ’ हा व्यापक अर्थ आहे; हवन हा यज्ञाचा मुख्य भाग आहे.
- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यामध्ये अग्निचा महिमा वर्णन केला आहे.
- अग्निहोत्र, पुष्पहोम, लक्षचंडी होम, नवचंडी होम, महालक्ष्मी होम, संपुटित पाठात्मक होम यांसारख्या विविध हवन प्रकारांमध्ये विशिष्ट देवतेसाठी आहुती दिली जाते.
हवनाची मुख्य उद्दिष्टे
-
पापनाश
-
इच्छित फळप्राप्ती (आरोग्य, समृद्धी, शांती)
-
वास्तुशांती
-
वातावरण शुद्धीकरण
-
आध्यात्मिक प्रगती
हवनाची आवश्यक सामग्री
- अग्निकुंड (होमकुंड)
- समिधा (समिधा = विशिष्ट लाकडाच्या काड्या, उदा. पळस, उंबर, आंबा, शमी)
- हविष्य (साजूक तूप, तिळ, जव, नवीन तांदूळ, मध)
- दुर्वा, बेल, हवन सामग्री, लोबान, कपूर
- पाणी, अक्षता (शुभ तांदूळ), फुले, सुपारी, नैवेद्य
हवन प्रक्रिया
(सामान्य क्रम)
शुद्धीकरण —
मंडप, हवनकुंड, पुरोहित, सहभागी व्यक्ती यांचे शुद्धीकरण
दीप प्रज्वलन
संकल्प —
कोणत्या हेतूने हवन केले जात आहे ते सांगणे
कलश स्थापना व पूजन
अग्निप्रज्वलन —
अग्नीची विधीपूर्वक प्रज्वलन
मुख्य देवतांचे आवाहन स्थापन पुजन
आहुती —
मंत्रोच्चारासह हविष्याची आहुती (साजूक तूप, समिधा) अग्नीमध्ये अर्पण करणे
पूर्णाहुती —
अंतिम मोठी आहुती, संकल्पसिद्धीची प्रार्थना
आरती व प्रसाद वितरण
महत्त्वाचे मंत्र
स्वाहा मंत्र —
प्रत्येक आहुती देताना शेवटी “स्वाहा” म्हणायचे.
शांतिमंत्र, पूर्णाहुती मंत्र, कल्याणमंत्र —
पूर्णाहुतीवेळी.
हवनाचे फायदे
- मनाची एकाग्रता वाढते.
- वास्तुमधील दोष दूर होतो.
- सकारात्मक ऊर्जा वाढते.
- पर्यावरणातील जंतू नष्ट होतात.
- आंतरिक व बाह्य शुद्धी मिळते.