Panchang Vastu Name

||  आमच्या बद्दल ||

Panchang Vastu Name
Five Elements

असोसिएट्स बद्दल 

मी,श्री सचिन काशीनाथ जोशी   एक अनुभवी वैदिक कर्मकांड तज्ज्ञ, ज्योतिषाचार्य आणि वास्तु सल्लागार व तसेच एक तज्ञ अंकशास्त्रज्ञ  गेली २५ वर्षे लोकांना त्यांच्या जीवनातील अडथळे, शंका व समस्यांवर शास्त्रशुद्ध उपाय देत आहे. माझे कार्य नाशिक येथून केंद्रित असून, अखिल भारत आणि ऑनलाइन सेवेमार्फत व तसेच देशविदेशातील  (कॅनडा, अमेरिका, रशिया इत्यादी)लोकांनाही माझ्या सेवांचा लाभ मिळतो.

माझे शिक्षण नाशिक येथील श्री गुरुगंगेश्वर  वेदशाळेत  व वाराणसी  कर्नाटक  येथील प्रसिद्ध  वैदिक गुरुकुलांमध्ये झाले असून, तिथे मी वेद, कर्मकांड, पारंपरिक ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र यांचा  गाढा अभ्यास केला आहे.
आम्ही  वैदिक परंपरेचे पालन करत, आधुनिक काळाशी सुसंगत अशी  उपाययोजना व मार्गदर्शने करतो

असोसिएट्सचे उद्दिष्ट 

मानवी जीवन हे पुढील चार स्तंभांवर आधारित आहे म्हणजेच १. कर्म, २. दैवी शक्ती (सकारात्मक ऊर्जा), ३. वास्तु आणि ४. जन्म कुंडली. प्रत्येक स्तंभ समान (२५%) भार वाहत असतो. ज्याप्रमाणे आपले शरीर एकाच प्रकारचे अन्न खाऊन आवश्यक पोषक तत्वे मिळवू शकत नाही, त्याचप्रमाणे जीवनात पंचमहाभूतांचे संतुलन बिघडले किंवा कोणत्याही घटकाची कमतरता असेल तर जीवन निरर्थक बनते. त्यातही वास्तु, कुंडली, कर्म आणि दैवी शक्ती (सकारात्मक ऊर्जा) यांचे संतुलन साधता येते परंतु जरी भाग्य (पूर्व संचित) साठी कोणताही उपाय नसला तरी उर्वरित घटकांपासून परिणाम सकारात्मक बनवता येतात आणि सचिन जोशी पंचांग वास्तू असोसिएट्स हेच करण्याचा १००% प्रयत्न करतो.

असोसिएट्सचे ध्येय

श्री सचिन जोशी गुरुजींच्या वास्तूशास्त्रातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून अनेक लोकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

न त्वहं कामये राज्यम् । न स्वर्ग न पुनर्भवम् ।।
कामये दुःखतप्तानाम् । प्राणिनाम् आर्तिनाशनम् ।।

” अर्थात “मला ना राज्याची इच्छा आहे, ना स्वर्गाची आणि ना पुन्हा जन्म घेण्याची (मुक्तीची). माझी फक्त एकच इच्छा आहे – दुःखाने ग्रस्त असलेल्या सर्व माणसाचे दु:ख दूर करणे.” या उक्तीप्रमाणे, श्री सचिन जोशी गुरुजी मानवकल्याणासाठी कार्यरत आहेत. ते आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणण्यासाठी करतात. “संकल्पात् जायते सिद्धि” या उक्तीनुसार, श्री सचिन जोशी गुरुजी आपल्या दृढनिश्चयाने लोकांना वास्तूशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात यश मिळवण्यास मदत करतात.

श्री. सचिन जोशी गुरुजी

– वास्तूतज्ञ आणि ज्योतिष मार्गदर्शक

सचिन जोशी पंचांग वास्तू असोसिएट हि फर्म गेल्या 25 वर्षांपासून वैदिक कार्य, ज्योतिष शाश्त्र आणि वास्तू शास्त्र या तिन्ही क्षेत्रात कार्यरत असून विविध प्रकारचे यज्ञ कर्म, विवाह, नवचंडी, वास्तू शान्ति तसेच ज्योतिष शाश्त्र आणि वास्तू शाश्त्रच्या अचूक ज्ञानाच्या जोरावर भारत आणि भारताबाहेर अनेक परिवाराला त्यांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक अडचणी तुन बाहेर येण्यासाठी कायम योग्य ते मार्गदर्शन करतात. उत्तम गुरु कृपेने नासिक येथील गुरुगंगेश्वर वेद मंदिर येथे वेदांचे ज्ञान संपादन करुन नासिक,काशी, कर्नाटक धारवाड येथून वास्तू आणि ज्योतिष विद्या संपादन केली.भविष्यात ज्योतिष शाश्त्र,वास्तुशाश्त्राचा प्रचार प्रसार व्हावा, या प्राचीन विद्येचा अनुभव सगळ्यांना यावा यासाठी  ज्ञान दानाचे कार्य सुरु आहे.

श्री सचिन जोशी गुरुजी – वास्तूशास्त्र आणि समाधान

श्री सचिन जोशी गुरुजी हे नाशिकमधील एक अनुभवी वास्तू सल्लागार आहेत, जे ‘सचिन जोशी पंचांग वास्तू असोसिएट्स’ या संस्थेच्या माध्यमातून लोकांना वास्तूशास्त्रातील अचूक मार्गदर्शन करतात. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून ते लोकांच्या घरांमध्ये आणि व्यावसायिक जागांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि शांती लाभते.

श्री सचिन जोशी गुरुजींच्या वास्तूशास्त्रातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून अनेक लोकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

न त्वहं कामये राज्यम् । न स्वर्ग न पुनर्भवम् ।।
कामये दुःखतप्तानाम् । प्राणिनाम् आर्तिनाशनम् ।।

” अर्थात “मला ना राज्याची इच्छा आहे, ना स्वर्गाची आणि ना पुन्हा जन्म घेण्याची (मुक्तीची). माझी फक्त एकच इच्छा आहे – दुःखाने ग्रस्त असलेल्या सर्व माणसाचे दु:ख दूर करणे.” या उक्तीप्रमाणे, श्री सचिन जोशी गुरुजी मानवकल्याणासाठी कार्यरत आहेत. ते आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणण्यासाठी करतात. “संकल्पात् जायते सिद्धि” या उक्तीनुसार, श्री सचिन जोशी गुरुजी आपल्या दृढनिश्चयाने लोकांना वास्तूशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात यश मिळवण्यास मदत करतात.

Sachin Joshi guruji
Astrology Planet

पंचांग वास्तु म्हणजे काय?

पंचांग वास्तु हा वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि पंचतत्वांवर आधारित एक समग्र शास्त्र आहे, जे मानवी जीवन संतुलित आणि सकारात्मक बनवण्यासाठी कार्य करते. “पंचांग” हा शब्द पाच महत्त्वाच्या घटकांचा (तत्वांचा) समावेश करणारा आहे – तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. या पाच घटकांवर आधारित वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मिक उपाय यांचा समुचित अभ्यास करून, जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि ऊर्जा संतुलित करण्यासाठी पंचांग वास्तु मदत करते.  

पंचांग वास्तुचे महत्त्व:

पंचतत्व – अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश – या पाच तत्वांवर संपूर्ण सृष्टी आधारलेली आहे. जर ही तत्व संतुलित नसतील, तर घरामध्ये किंवा कार्यस्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात विविध समस्या उद्भवतात. पंचांग वास्तुच्या माध्यमातून या पंचतत्वांचे संतुलन साधता येते, ज्यामुळे जीवन अधिक सकारात्मक, आरोग्यदायी आणि समृद्ध बनते.

पंचांग वास्तुचा उपयोग कोणासाठी?

  • घरातील वास्तुदोष दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी
  • व्यवसाय आणि कार्यालयातील उन्नतीसाठी
  • मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी
  • ग्रहदोष निवारणासाठी आणि शुभ फलप्राप्तीसाठी
  • आध्यात्मिक प्रगती आणि शांततेसाठी

पंचांग वास्तु अंतर्गत समाविष्ट घटक:

  1. वास्तुशास्त्र: घर, दुकान, कार्यालय यांची योग्य रचना आणि ऊर्जेचे संतुलन करण्यासाठी
  2. ज्योतिषशास्त्र: ग्रहदोष, कुंडली विश्लेषण आणि त्यावरील उपाय
  3. अध्यात्मिक उपचार: पूजा, हवन, यज्ञ, उपासना, साधना
  4. ऊर्जा चिकित्सा: रेकी, क्रिस्टल हीलिंग, डाऊसिंग पेंडुलम

वैदिक उपचार: रुद्राक्ष, यंत्र-तंत्र, मंत्र उपाय

आमच्या उत्तम सेवा

|| वैदिक शास्त्र ||

पूजा विधी

यज्ञ कर्म

वैदिक विवाह संस्कार

उपाय

उपनयन संस्कार

अध्यात्म

हवन कार्य

उपासना

|| ज्योतिष शास्त्र ||

ज्योतिष

क्रिस्टल हिलिंग

अंकशास्त्र

रत्नशास्त्र 

रेकी

रुद्राक्ष

डाऊझिंग पेंडुलम

उपासना आणि उत्पादने

|| वास्तु शास्त्र ||

वास्तु कन्सल्टिंग

भू-उर्जा तणाव

भूमि परिक्षण

वास्तु योजना

वास्तु परीक्षण

यंत्र आणि क्रिस्टल उपाय योजना

वास्तु ऑरा स्कॅनर