आमच्या बद्दल

मुख्यपृष्ठ - आमच्या बद्दल

श्री. सचिन जोशी गुरुजी

अधिक माहितीसाठी, Call: (+९१) ९५५२० ९५१५९

25 +

वर्षे अनुभव

1000 +

फोन कंसल्टेशन्स

5000 +

साक्षर अभ्यास

100 +

वस्तू पूजा

50 +

अंतरराज्यीय पूजा

15 +

देशव्यापी पूजा

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

श्री सचिन काशीनाथ जोशी
२५+ वर्षांचा
समृद्ध अनुभव
अनुभव आणि परंपरा

|| आमच्या बद्दल ||

मी, श्री सचिन काशीनाथ जोशी, एक अनुभवी वैदिक कर्मकांड तज्ज्ञ, ज्योतिषाचार्य, वास्तु सल्लागार आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत आहे.

माझे कार्य नाशिक येथून केंद्रित असून, ऑनलाइन सेवेमार्फत देशविदेशातील लोकांनाही माझ्या सेवांचा लाभ मिळतो. माझे शिक्षण नाशिक येथील श्री गुरुगंगेश्वर वेदशाळेत व वाराणसी आणि कर्नाटक येथील प्रसिद्ध वैदिक गुरुकुलांमध्ये झाले आहे.

तिथे मी वेद, कर्मकांड, पारंपरिक ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र यांचा गाढा अभ्यास केला आहे. आम्ही वैदिक परंपरेचे पालन करत, आधुनिक काळाशी सुसंगत अशी उपाययोजना व मार्गदर्शने करतो.

वैदिक शिक्षण
जागतिक सेवा
शास्त्रोक्त उपाय
श्री सचिन जोशी गुरुजी
२५+ वर्षांचा अनुभव
“संकल्पात् जायते सिद्धि”
वास्तूतज्ञ आणि ज्योतिष मार्गदर्शक

श्री सचिन जोशी गुरुजी

सचिन जोशी पंचांग वास्तू असोसिएट्स ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून वैदिक कार्य, ज्योतिष शास्त्र आणि वास्तू शास्त्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. विविध प्रकारचे यज्ञकर्म, विवाह, नवचंडी, वास्तूशांती तसेच अचूक ज्योतिष व वास्तु मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी भारतात आणि भारताबाहेर अनेक कुटुंबांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्यास मदत केली आहे.

नाशिक येथील गुरुगंगेश्वर वेद मंदिर येथे वेदांचे शिक्षण घेतले तसेच नाशिक, काशी आणि कर्नाटक (धारवाड) येथून वास्तू आणि ज्योतिष विद्या संपादन केली. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा प्रचार-प्रसार व्हावा आणि समाजाला या विद्येचा लाभ मिळावा यासाठी ते ज्ञानदानाचे कार्य सातत्याने करीत आहेत.

वास्तूशास्त्र आणि समाधान

श्री सचिन जोशी गुरुजी हे अनुभवी वास्तू सल्लागार असून घर, कार्यालय आणि व्यावसायिक जागांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी अचूक मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवामुळे अनेकांनी आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवले आहे.

“न त्वहं कामये राज्यम्। न स्वर्ग न पुनर्भवम् ।। कामये दुःखतप्तानाम् । प्राणिनाम् आर्तिनाशनम् ।।

अर्थात: “मला ना राज्याची इच्छा आहे, ना स्वर्गाची आणि ना पुन्हा जन्म घेण्याची (मुक्तीची). माझी फक्त एकच इच्छा आहे – दुःखाने ग्रस्त असलेल्या सर्व माणसाचे दु:ख दूर करणे.”

या विचारसरणीनुसार श्री सचिन जोशी गुरुजी मानवकल्याणासाठी कार्यरत आहेत. ते आपल्या ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर लोकांच्या जीवनात सकारात्मकता, यश आणि समाधान निर्माण करण्यासाठी समर्पित आहेत.

आमची गॅलरी

गुरुजीची कार्यशाळा आणि यज्ञ

पंचांग वास्तु म्हणजे काय?

Panchang Vastu

पंचांग वास्तु हा वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि पंचतत्वांवर आधारित एक समग्र शास्त्र आहे, जे मानवी जीवन संतुलित आणि सकारात्मक बनवण्यासाठी कार्य करते. “पंचांग” हा शब्द पाच महत्त्वाच्या घटकांचा (तत्वांचा) समावेश करणारा आहे – तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. या पाच घटकांवर आधारित वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मिक उपाय यांचा समुचित अभ्यास करून, जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि ऊर्जा संतुलित करण्यासाठी पंचांग वास्तु मदत करते.

पंचांग वास्तुचे महत्त्व

पंचतत्व – अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश – या पाच तत्वांवर संपूर्ण सृष्टी आधारलेली आहे. जर ही तत्व संतुलित नसतील, तर घरामध्ये किंवा कार्यस्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात विविध समस्या उद्भवतात. पंचांग वास्तुच्या माध्यमातून या पंचतत्वांचे संतुलन साधता येते, ज्यामुळे जीवन अधिक सकारात्मक, आरोग्यदायी आणि समृद्ध बनते.

पंचांग वास्तुचा उपयोग कोणासाठी?

  • घरातील वास्तुदोष दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी
  • व्यवसाय आणि कार्यालयातील उन्नतीसाठी
  • मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी
  • ग्रहदोष निवारणासाठी आणि शुभ फलप्राप्तीसाठी
  • आध्यात्मिक प्रगती आणि शांततेसाठी

समाविष्ट घटक:

वास्तुशास्त्र: घर, दुकान, कार्यालय यांची योग्य रचना आणि ऊर्जेचे संतुलन करण्यासाठी
ज्योतिषशास्त्र: ग्रहदोष, कुंडली विश्लेषण आणि त्यावरील उपाय
अध्यात्मिक: पूजा, हवन, यज्ञ, उपासना, साधना
ऊर्जा चिकित्सा: रेकी, क्रिस्टल हीलिंग, डाऊसिंग पेंडुलम
वैदिक: रुद्राक्ष, यंत्र-तंत्र, मंत्र उपाय
0+

|| ज्योतिष शास्त्र ||

सटीक कुंडली विश्लेषण और मार्गदर्शन

0+

|| वैदिक शास्त्र ||

शास्त्रोक्त विधी आणि पूजा मार्गदर्शन

0+

|| वास्तुशास्त्र ||

समृद्धीसाठी शास्त्रीय वास्तु उपाय